STORYMIRROR

yogesh Chalke

Others

3  

yogesh Chalke

Others

माझ्या बंधवा समिंदरा

माझ्या बंधवा समिंदरा

1 min
465


सांग निरोप तू माहेरा

माझ्या बंधवा समिंदरा

लाट उसाळते काय ती

बोलते नांद सुखानं

तू सासुरा सांग निरोप

तू माहेरा माझ्या बंधवा समिंदरा ॥धृ॥


ठेव नजर धन्यावर देस

मायेचा पाझर आण बेगीन

तू माघारा नको उधाणू

तू सागरा माझ्या बंधवा समिंदरा ॥१॥


आईबाबांना सांग खुशाली जीव

त्यांचा होई वरखाली धाड भेटीला

सहोदरा देस निरोप हा

सागरा माझ्या बंधवा समिंदरा ॥२॥


कसा सुसाटला हा वारा

नाही होडीला माझ्या थारा

नको घुमवू अशी गरगरा

नेशील जपून पैलतिरा

माझ्या बंधवा समिंदरा ॥३॥


तुझ्या जीवावर आमची मौज

पोट भरतोस राजा रोज हाय

भरोसा आमचा खरा तारू

जपशील रे सागरा माझ्या बंधवा समिंदरा ॥४॥


Rate this content
Log in