STORYMIRROR

Vrushali Khadye

Others

4  

Vrushali Khadye

Others

माझ्या आठवणीतील पाऊस

माझ्या आठवणीतील पाऊस

1 min
27.1K


तारुण्याच्या उंबरठ्यावर

नुकतेच पडले पहिले पाऊल

रिमझिम रिमझिम पाऊसधारा

सख्याच्या संगतीची देती चाहूल


आणि गोड त्या वळणावर

भेटला मज प्रिय साजन

मनमंदिरातील त्याची छबी

भासे मज तो वीर राजन


अवचित मृगधारांची बरसात

संगे सौदामिनीचा कडकडाट

अलगद शिरले कवेत त्याच्या

अनुभवला यौवनाचा थरथराट


झिम्मड पावसात साजनासवे

मनी प्रेमाची पालवी फुटली

भविष्यातील सुरेख गोड स्वप्ने

अलगद अंतरंगी रेखाटली


Rate this content
Log in