STORYMIRROR

Smita Doshi

Others

4  

Smita Doshi

Others

माझं बालपण

माझं बालपण

1 min
411

चिमुकले किती ते बालजीवन

निष्पाप किती ते होते बालमन

क्षणात रुसवे, क्षणात फुगवे

क्षणात हसावे, क्षणात रडावे


सुवर्ण परिसासम होते ते बालपण

आठवून आजही होते ताजे मन

वाटते आणखी एकदा ते अनुभवावे

देवाच्या कानात जाऊन ते कुजबुजावे


नको ते मोठेपण, नको ते थोरपण

हवे ते निरागस, निष्पाप बालपण

मन नकळत हेलावते, आठवता बालपण

विसरवून टाकते आजचे मोठेपण


मिळावा परतुनी जन्म, व्हावे एकदम लहान

यथेच्छ हुंदडावे, रडावे, भांडावे सख्यासोबत

काढाव्या खोड्या, खावा थोडासा मार

पण फिरुनी मिळावे बालपण एकवार


Rate this content
Log in