माझिया प्रियाला प्रित कळेना
माझिया प्रियाला प्रित कळेना
ध्यानीमनी तुझेच नाव असते
खरोख बरोबर तू नसताना
तूच बरोबर असणे मत वाटते
हेच खरे प्रेम असते ।१।
कणभर अंतर दोघात न उरण
इतका तू - मी अन् मी- तू सारखेच वाटते
तुझ्यात मी अन् माझ्यात तूच जिवित भासते
हेच खरे प्रेम असते ।२।
रोज प्रत्येक घडीला भेटणे असते
अशीच मी सप्तपदी सप्तवचनात
तू तिथं मी आणि मी तिथ़ तू नित्याने चालते
हेच खरे प्रेम असते । ३।
प्रज्ञेशात तूच विराजमान असते
मधाळ वाणीतून शब्द तुझेच कानात निनादते
तो बाबा म्हणे त्यासी सांगणे असते
हेच खरे प्रेम असते । ४ ।
तुझ्यात ती हास्यमुद्रा अवखळते
असतोच तू दूरदेशा पण मज न वाटते
दिसतोच तू माझ्या हवेत भासते
हेच खरे प्रेम असते । ५ ।
