माझी मायबोली
माझी मायबोली
1 min
208
प्रिय असते सर्वांना
आपुलीच मायबोली
वदते हितगुज मनीचे
कळतेय तिची खोली
रसाळ अमृताहुनीही
माझी मराठी भाषा
ज्ञानेश्वरांनाही उमगली
जागविली मनी आशा
नाही डामडौल तिचा
साधी सरळ नि सोपी
प्रेमिकांच्या प्रेमातली
ठेवते हृदयातच कुपी
मोरोपंत श्रीधर कवींनी
अलंकारांनी सजविले
ज्ञाना तुका एकनाथांनी
तिज कीर्तनी भजविले
वाटतोय मराठी जनास
मायमराठीचा अभिमान
राखूया मिळून सारेजण
त्या माधुर्याचा सन्मान
देवी सरस्वतीही नाचते
कविंच्या ओठी सप्तसूर
ना अश्लिलतेचा काही
पूजिती मराठी नारी नर
