माझी माय मराठी
माझी माय मराठी
1 min
546
माझी मराठीये ची बोली
किती किती त्याची खोली
बाळाचे बोबडे बोल होई तज्ञांची शिदोरी
माझी मायबोली माझ्यासंगे होई मोठी
तिच्या भाषेची ही गोड काय देऊ मी तिच्यासाठी
माय हा शब्द ही मायेनं बोलायला लावणारी शब्द
शब्दांची गुंफण रचून वाक्य करणारी
शब्दांमधील भावना समजून घेणारी
आणि माझ्या आयुष्यातल्या वक्तव्याची
अशी आयुष्याची शिदोरी
संत ज्ञानोबा, तुकोबा ,चोखोबा
एकनाथ महाराजांनी अमृत शिंपडले ती मायबोली
माझी मराठी माझी मायबोली
सार्थ अभिमान मला मी वारसदार तिची
