माझी कविता
माझी कविता
1 min
356
माझी कविता बोलते
मनातील माझ्या भाव
तुझ्या सोबतीत जातो
भरला माझा गाव
माझी कविता सागंते
वेदना माझ्या मनातली
कहाणी वदते आपल्या
भकास कोरड्या आयुष्यातली
माझी कविता विनवते
पाळण्या नियम सारे
वाहू देते समाधानाने
भावनांचे खळखळ झरे
माझी कविता नादंते
शब्दांच्या सुखी संसारात
वेगवेगळ्या आवेगाच्या
बहरलेल्या सदरात
