Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sayali Kulkarni

Classics Children

4.1  

Sayali Kulkarni

Classics Children

माझी आजी...

माझी आजी...

1 min
551


जरी सरले तारुण्य... 

अंगी असे उत्साह यौवनाचा...

माझी आजी म्हणजे... 

खळखळता झरा चैतन्याचा...||


ती शिकविते आम्हा श्लोक... 

गीता व रामरक्षेचे...|

आणि गिरवूनी घेते धडे

शिस्त नि स्वावलंबनाचे...||


आजी घरी असता... 

लेकरां न लागे संस्कारवर्ग...

तिच्या फक्त आस्तित्वाने... 

घरीच अवतरतो स्वर्ग...||


बनूनी मऊ रेशमी धागा... 

ती करते नात्यांची गुंफण... 

सर्वांना एकत्र बांधणारी... 

ती तर असते कोंदण...||


तिच्या हातची भाकरी खाता... 

येई ढेकर तृप्तीची...|

तिची मऊ गोधडी पांघरता... 

मिळे ऊब ममतेची...||


सर्वांच्या जपते आवडी... 

ती झटते दिवसरात्र...

आपले वेचते आयुष्य... 

न विश्रांती क्षणमात्र...|| 


माझे मागणे ऐक देवा... 

पूर्ण करी तिच्या सर्व इच्छा... 

अशी आजी सकळा मिळो... 

हीच माझिया मनी सदिच्छा... ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics