माझी आई
माझी आई
काळोख्या अंधारातही अनवानी
चालायला शिकलो होतो
चांदण्यांची निश्वार्थ साथ होती
माझी आई माझ्या सोबत होती
बाईच्या हातात हाथ धरून
आई चा आ तर शिकलो
आ पासूनचा आत्मसम्मान शिकवायला
आई सोबत होती
समाजाने खुप छळ केला
बदनामीचा तर कहरच केला
विश्वासाने उभा राहू शकलो
कारण माझी आई माझ्या सोबत होती
जिवणाच्या वाटेवर अडखळलो
पडलो धडपडलो विश्वास गमावलो
संपल सगळ वाटत असताना
अचानक आईची सावली दिसली
आ पासूनचा आत्मविश्वास मिळवायला
माझी आई माझ्या सोबत होती.
नादान रोपट्याचा वॄक्ष झालो
माणूस तर झालो माणूसकीही शिकलो
अफाट संकटावर मात करत गेलो
खंबीरपणे उभा रहात होतो
माझ्यासाठी जळणारी दिव्याची वात होती
ह्या जिवनाशी लढा देताना
माझी आई माझ्या सोबत होती
