माझे बाबा
माझे बाबा

1 min

160
दयेचा आगर
प्रेमाचा सागर
भरली घागर
माझे बाबा
कामाला ना अंत
काटेकोर पंत
सतत कामात
झोकतसे
साऱ्यांची काळजी
आवड निवड
नाही हो सवड
स्वतः साठी
बनले साहेब
कामाचे कर्तब
झोकले अबब
देशसेवा
नमस्कार माझा
बाबांच्या कार्याला
प्रेरणा आम्हाला
तुम्ही बाबा