STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
169

सह्याद्रीच्या सह्यकड्यांचे , मराठमोळे वीर

देशरक्षणा प्राणपणाने , तळहाती शीर    (1)


शूर शिवाजी , छाव्याची महाराष्ट्र कर्मभूमी

पेशवाईची , रामशास्त्रींची

कामगिरी नामी   (2)


भारतमाता मुक्त कराया , 

देशभक्त थोर

कवटाळिती प्रत्यक्ष यमा , सोडुनी संसार   (3)


कर्मभूमी मराठमोळी , संगीत कलासक्त

आशा लता ग दि मा निरविवर्मा भक्त    (4)


 अभंगातही थोरसाधना, ज्ञाना , तुकयांची

एकनाथी भारुडे नि आर्या मयूरपंतांची  (5)


वारक-यांची परंपरा , भक्तिमार्गा लाभली

पंढरीच्या विठूरायापायी , भावभक्ती लोटली  (6)


लोकधारा ह्या भूमीची , लावणी ,गण ,गौळण

लोकनाट्य , कथा , गजाली,

कर्णमधुर कीर्तन  (7)


साहित्यगंध दरवळतसे , अवघ्या विश्वात

बहिणाबाई , शांताबाई , 

पु. ल. वा. रा. कांत  (8)


स्त्रिया प्रगतीशील , सर्वोच्च 

पद भूषविले

फुले नि कर्वे दांपत्यांनी , ज्ञानामृत दिधले   (9)


महाराष्ट्र कर्मभूमी , लाभली थोर संचिते

पुर्नजन्मही ह्याच भूमीत , मनीषा प्रार्थिते   (10)


Rate this content
Log in