STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

माझा जीव ( अष्टाक्षरी )

माझा जीव ( अष्टाक्षरी )

1 min
343

तुझ्या सोनपावलांनी

बरकत आली अशी !

लागू पाहे ती नजर 

आमचीच पहा कशी ?


तुझ्या हास्याने अंगणी

पारिजातकाचे सडे

घरभर बागडती

बोल तुझे ते बोबडे


तुझ्या आगमनाने त्या

आली पूर्तता जीवनी

दुःख आता कशाचे ते

आनंदात क्षणोक्षणी


माझा जीव तुझ्यात ग

तुच आमचा श्वास ग

दूर होता डोळयाआड

धस्स ते काळजात ग


Rate this content
Log in