माझा देश
माझा देश




बर्फाच्छादीत मुगुट शिरावर
धारण करून आहे हा थंड
डोळे मोठे करून बघाल तर
तयार आहे मी ठोकून दंड
वाळवंटात जरी राहतात
सुखी असती माझे अनुयायी
उंटावरून करून सवारी
आनंदाने गाणी गायी
समुद्रकिनारा खळखळतो
नारळी पोफळीची सुबत्ता
मासेमारीवर चाले जिवन
हिच आमची मालमत्ता
चहाचे मळे बहरलेले
घरे सजली बोटींमधून
विविधता नटलेली आमची
पोषाखातल्या नवढंगातून
माझा देश असे अनोखा
नवरत्नांची जणू खाण
आम्ही लेकरे या भूमीची
सार्थ असे आम्हा अभिमान