माझा छंद
माझा छंद
1 min
380
आठवणींच्या गर्द तिमिराला
शब्दांच्या तेजोमय तारकांतून
काव्यरुपाने उजळविण्याचा
माझा छंद आगळाच आहे
अंधश्रद्धेच्या छायेला
ज्ञानाच्या शब्दांलकाराने
प्रकाशमय पथावर आणण्याचा
माझा छंद आगळाच आहे
व्यसनाधीन या मानवजातीला
सत्मार्गावर आणण्यासाठी
काव्यातून व्यसनमुक्त करण्याचा
माझा छंंद आगळाच आहे
सुंदर या जीवनातील
निसर्गाच्या हरेक सौंदर्याला
कवितेतून अनुभवण्याचा
माझा छंद आगळाच आहे
मनीच्या सा-या भावनांना
सुरेख शब्दमण्यांत गुफूंन
काव्यमाळेला सचेतन बनवण्याचा
माझा छंद आगळाच आहे.
