STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

माझा छंद...

माझा छंद...

1 min
825

छंद मला लागला

कविता अन चारोळीचा

शब्द शब्द गुंफले

मळा तयार झाला शब्दांचा...


शब्दात मन गुंतले वसुधाचे

वाक्यात काव्य शोधले

कवितांच्या बागेत मन

वसुधाचे खूप खूप रमले...


कविता वसूची छान सजली

चारोळीतही ती चमकली

कवितांच्या उद्यानी वसुधा

मस्त रमायला लागली...


तिला हौस रांगोळीची

छंद जोपासला चित्रकलेचा

विषय आवडीचा कार्यानुभवचा

आनंद घेते ती गायनाचा...


लहान मुले वसुला अतिप्रिय

मुलांनाही मॅडम आवडतात

उपक्रमात मुले खूश राहतात

शिकण्यात रस दाखवतात...


Rate this content
Log in