माझा भाऊ
माझा भाऊ
1 min
723
माझा पहिला मित्र तू
आनंदाचा वाटेकरी तू।।
तुझ्याविना करमेना
तुझ्याशिवाय माझे जमेना ।।
दुःखाच्या समयी धावून येई
उदास झालेल्या मनाला हसवून जाई।।
तुझी साथ बळ देणारी
तुझ्या सोबतीने जिंकू दुनिया सारी।।
भाऊ माझा जणू आनंदाचा झरा
वाहणारा सुखाचा मंदमंद वारा।।
तुझ्या आनंदाशिवाय दुसरे मागणे नाही
तुझी साथ असता नको मजला दुसरे काही।।
सुख दुःखाच्या क्षणी पाठीशी खंबीरपणे उभे राहू
प्रत्येक प्रसंगी हात हातात ठेवू।।
