STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

माझा बाप्पा

माझा बाप्पा

1 min
7

 पार्वतीचा आहे बाळ 

 गजानन त्याचे नाव 

 रूप साजिरे गोजिरे 

 अंतरीचा घेतो ठाव...||१||


 वर्षातून एकदाच 

 येतो आमच्या घराला

 काळजात माझा बाप्पा 

 नियमित निवासाला...||२||


 देवताच तू बुद्धीची 

 आज आहे आगमन 

 झाली स्वच्छता घराची 

 सुखावले तन मन....||३||


 अधिपती तू गणांचा 

 राजा आहेस जनांचा 

 राज्य करी मनावरी 

 खात्मा करी संकटांचा... ||४||


 तुझे मूषक वाहन 

 तुला मोदक अर्पण 

एकवीस दुर्वा करी 

मनोभावे समर्पण...||५||


Rate this content
Log in