माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
1 min
506
हिरव्या हिरव्या शेतामध्ये
घाम गाळतो शेतकरी
त्याच्या कष्टाचे चीज होते
जेव्हा पडतात श्रावणसरी
अन्नधान्य, फळभाज्या
तेल, कापूस घरोघरी
शेतकऱ्यांच्या मेहनतीने
प्रत्येकाचे पोट भरी
बाप माझा शेतकरी
अभिमानाने मुलगा सांगतो
त्याच्यामधेही घडत असतो
एक नवा शेतकरी !
