Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

माझा बाबा

माझा बाबा

1 min
30


पहाडासारखा खडा कसा असू शकतोस

प्रत्येकाला कोणत्या चष्म्यातून तू बघतोस


तुझा साधेपणा का उतरत नाही माझ्यात

आपूलकीच रसायन भरलय का तुझ्यात 


किती सोसतोस तरीही सावरतोस सगळं 

मिसळून जातोस दिसल जरी जग वेगळं


तळमळत असतोस पण दाखवत नाहीस कधी 

दुखल खूपल तरीही विवळत नाहीस कधी 


असा कसा रे न कळणारा तू माझा बाबा 

तुझ्या आठवणींनी भरलाय माझ्या स्वप्नांचा डबा 


दूर असलास तरीही काळजी करतोस आमची 

आमच्या सौख्यासाठी दूरदृष्टी तुझी लाबंची


Rate this content
Log in