माहेर
माहेर
1 min
212
आईच्या उंबऱ्याआड
खेळावी चूलबोळकी
हवे तेवढे घालून
मिरवावी परकर पोलकी
आणावा रोब राणीचा
आईच्या माजघरात
मांडावा सारिपाट
माहेरच्या दारात
लग्न बाहूलाबाहूलीचे
लावावे थाटामाटात
पंगतीत बसावे एका ताटात
माहेरच्या अंगणात
सगळं आपलच असतं
सासरी गेल्यावर ते
आपलस कराव लागत
