माहेर
माहेर
1 min
182
(1) माझं माहेर दूरचि , आहे गावाकडे
चिरेबंदी वाडा अन् , सोपे चहूकडे
(2)आई बापाची सावली , माया प्रेमाचे माहेर
बहिण नि भाऊ माझे , मिळे गप्पांचा आहेर
(3) माझं माहेर गेलं आता , अमेरिकेस निघून
गप्पा मारी भाऊ-वहिनी , आता
स्काइपमधून
(4) माझ्या माहेरी फुलझाडं , सोनचाफा जाई जुई
मंडपामधूनी सुगंध , मनाला गं भारी सुखवी
(5) काही दिसांचं माहेर , आता झाले मी पाहुणी
झटती गं माझ्यापायी , माझी भावंडं लई गुणी.
