STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मागोवा

मागोवा

1 min
174

आयुष्यात येवुनी जगता जगता

जीवनातील अनमोल क्षण वेचते

छान सुखाचे सूर कुटुंबात गुंफते

प्रेमाचे धागे मनापासून जपते...


स्त्री या जन्मातील अनमोल देणं

आईबाबांची लाडाची परी

माहेर सोडून सासरी आली खरी

लावला दिवा दोनही घरी...


सप्तपदीची सात पावले सजनासंगे

सात वचने दिली विश्वासाने

अधुरी स्त्री पूर्ण झाली आता

भरभरून दिलेल्या पतीच्या सौख्याने...


अंतरीचे धागे जुळवून घेतले

अनमोल बीज उदरी वाढवले

हर्षाने आनंदात मनसोक्त नहाले

अधुरी स्त्री मी माता म्हणून भरून पावले...


मागोवा घेते आता या गतकालचा

सुखदुःखांचा डोंगर पचवला जीवनाचा

आता जरा स्वतःचे छंद पूर्ण करून मी

घोट घेतेय या जीवनी मनसोक्त आनंदाचा...


Rate this content
Log in