मागणे
मागणे
1 min
230
करावी म्हणतो पुन्हा मशागत
जुन्याच मातीत होऊदे रुजणे
बरकत होऊदे नव्या विचारांची
आहे एवढेच काय ते मागणे.
धारा घामाच्या वागवतो तनुवर
होऊदे जरासे श्रावणात भिजणे
नव्या जाणीवांची पेटूदे भूक नवी
संपूदे जरासे अकालीचे विझणे.
निजेला पारखा होऊन धाव अविरत
लाभो एकदा मायेच्या कुशीत निजणे
एकवेळ प्रभो तू वास कर रे ओठी
सोसेन कितीही मग लष्कराचे झिजणे.
ज्योत पेटूदे जगी एक सदसद्विवेकाची
भले तर पडावे रोज लज्जेलाच लाजणे
पसाभर पडूदे पदरात पुनवचे चांदणे
इतका उजेड पुरे आहे एवढेच रे मागणे
