लोककाव्य
लोककाव्य
1 min
282
विशिष्ट प्रांतातील लोकांचे
विशिष्ट काव्य असते
त्यावर त्यांची मुद्रा
पूर्ण उमटलेली असते.
जशी संस्कृती प्रांताची
काव्यही तसेच होते
काव्याला संगीत देता
लोकसंगीत जन्मा येते
प्रांताची प्रतिभा जशी
लोककाव्य दर्जेदार
प्रत्येक प्रांतातील लोकांचे
सादरीकरण कमाल.
फिरुनी प्रांत निरनिराळे
ऐकावी लोककाव्य बोली
बहुश्रुत होती जन
मन अपार तृप्त होई
