लोक काय म्हणतील
लोक काय म्हणतील
1 min
227
बाई म्हणून जन्मले
दीप दोन्ही घरी लावे
पवित्रता जीवनाची
संगे नशिबात यावे....
पुण्य पदरात पडे
मानपान तिला मिळे
सुशिक्षित बाई झाली
घरदारा ती सांभाळे...
पहिलीच स्त्री शिक्षिका
सावित्रीला मिळे मान
सुशिक्षित करे मुलीं
साहे खूप अपमान....
काय म्हणतील लोक
नाही विचारही केला
पती समवेत लढा
शिक्षणाचा तिने दिला...
खरे आहे सारे हेच
लोक काय म्हणतील
हाच विचार करत
जनामधे सांगतील...
