लग्न (सहाक्षरी)
लग्न (सहाक्षरी)
1 min
356
कोरोना कहर
कधी संपणार ?
त्या बोहल्यावर
कधी चढणार ?
पन्नास मर्यादा
लग्नाच्या कार्याला
थांबवावे कसे
सांगा वऱ्हाडाला
नाही नाचगाणे
ना डीजेची साथ
नखरा नवरी
बघतेय नथ
खर्च झाला कमी
उत्साह तो गेला
कमी त्या लोकांत
नाही बोलबाला
काही दिवसांनी
नवरा येईल
अलगद अशी
नवरी नेईल
