लेखणीतली मैत्री
लेखणीतली मैत्री
1 min
256
कधी न पाहिलेले कधी न भेटलेले
तरी लेखणीने बांधलेले नाते हे घट्ट आहे
तुझी माझी स्पर्धा नाही की मी तुझ्या वर चढ नाही
शब्दांच्या या खेळात चल जाऊ सोबत
यशपथावर मी तुझं कौतूक आणि तू माझं कौतुक आहे
अजाणतेपणी झालेल्या जखमेवर तुझ्या शब्दांची फुंकर आहे
हळूच काढलेल्या चिमट्यासोबत हास्याचा फवाराही आहे
अनोळख्या नात्यांचा विविध रंगी फुललेला पिसारा आहे
शब्दांनी गुंफलेल्या विणेत तू मी चा अहंभाव नाही
द्वेष, राग,स्वार्थ या शब्दांना थाराच नाही
मैत्रीचे जुळलेले ऋणानुबंध अनोळखी तरी
आपलेसे आहे एका गोष्टीची मात्र खात्री आहे
कुणी नसले सोबत तरी आयुष्यभर ही शिदोरी सोबत आहे.
