STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

लेखणी

लेखणी

1 min
395

लेखणी


नवे काही लिहण्याचा

नवे काही शोधण्याचा

शोध घेतेय लेखणी

नव निर्मिती करण्याचा


किमान चार ओळी

लिहायच्या आहेत त्या

ठाव मनिचा घेतील

अचूक प्रत्येकाच्या त्या


साधं सोपं अन् सरळ

लेखण ते सहज व्हावं

माझं म्हणणं माझ्याकडून

समोरच्याच्या काळजास भिडावं


छंद आहे लिहण्याचा

लिखाण ते घडत रहावे

दोन माझ्या त्या शब्दाने

इतरांनीही व्यक्त व्हावे


नवे जुणे प्रकार सारे

लिखाण ते व्हावे असे

प्रत्येक शब्द मग जणू

भेटावे नव्यानेच जसे



Rate this content
Log in