STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

लेक वंशाचा दिवा

लेक वंशाचा दिवा

1 min
15.6K


मुलामुलींमध्ये का भेदाभेद तुम्ही करता ? ।

मुलींसाठी मनामध्ये का दुजाभाव धरता? ।।


क्षेत्र कोणते उरले जिथे नाही मुली ? ।

अवकाशातही मुलींनी गरुडझेप घेतली ।।


मुलांपेक्षा मुली काकणभर सरस आहेत ।

ध्येयपूर्तीची जिद्द मनाशी धरत आहेत ।।


मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी पणती ।

दोन्ही घरात राहते सदासाठी मिनमिणती ।।


कर्तृत्वाने मुलगी मुलापेक्षा कमी नाही ।

वंशाचा दिवा म्हणायला काही हरकत नाही ।।



Rate this content
Log in