लढायचंय आता लढायचं
लढायचंय आता लढायचं
1 min
337
आपण आता थांबायच नाही
लढायचंय आता लढायचं
शत्रू आहे खूप मोठा
त्याला नाही कुठेच तोटा
चार हात करायच सार्यांनी
लढायचंय आता लढायचं
पाळून नियम सुरक्षेचा
मुकाबला आता करायचा
नाही कुणीच दमायच गड्या
लढायचंय आता लढायचं
मावळे आपण शिवबाचे
गनिमी कावा करायचा
कोरोनाला बाहेर काढायचा
हिम्मत नाही हरायची गड्या
लढायचंय आता लढायचं
स्वच्छतेचा प्रसार करायचा
धाडसाने रहायचा निर्णय घ्यायचा
प्रसंग आहे भलताच बाका
सार्यांनी थोडा संयम राखा
शक्ती पेक्षा करा युक्तीचा वापर
नका फोडू कुणाचे कुणावर खापर
स्वतः ला सिध्द आता करायचय
लढायचंय आता लढायचं
