लबाड लाल मुंग्या
लबाड लाल मुंग्या
1 min
470
आज माझ्या घरात तुम्ही उन्हाची चाहूल घेऊन आलात
लाल रंगाच्या किनारीच्या रांगोळीसम सजलात
हातात होते विणकाम म्हटले थांबा जरा येते नटून थटून
कशा आलात ते जवळ येऊनच बघते
काय तो मेला एक शेवेचा पडला तुकडा
त्यांच्याकडे लगेच तुमचा डोळा झाला वाकडा
आलात अशा डौलात आणि ठिय्या मांडून बसलात नुसत्याच नाही आलात तर आमचा चावाही घेतलात
माणसेही येत नाहीत कितीही तुम्ही बोलवा
तुम्हाला मात्र दरवर्षी धाडावाही लागत नाही सांगावा
हक्काने येता आठवणीने म्हटले सन्मान तुमचाही करावा
हळदी-कुंकू लावून घेऊन नंतर लक्ष्मणरेषेत बसवा
