लावणी... बेहोश अदा
लावणी... बेहोश अदा
तुमच्या प्रीतीने उजळली रात साजना
नाच नाचूनी मी दमलेय राया या क्षणा
संध्याकाळी गीत गाते लावूनी दिवावात
नवतरा वसंत भरलाय अंगागात...
जाई चमेलीच्या सुंगधाने माझे अंग अंग भारावले
गारवा गुलाबी मस्त शराबी अलगद मी शहारले।।धृ।।
ह्रदय प्रीतीचा सागरात कमळ उगवले
श्वासांच्या लाटेवर विहरती सुगांधाची फुले
रोमातून गांधाळली भरली शिरशिरी उरी
तुमच्या आवडीचीच मी प्रेमीका सुंदर मनाची परी...
जन्मांतराची साथ नशिली मी प्रेमात भान विसरले
गारवा गुलाबी मस्त शराबी अलगद मी शहारले ।।१।।
मंदमंद झुळूक वाऱ्याची गुज सांगून गेली
डोळा डावा फडफडला अन् पापणी ओलावली
व्याकुळमन माझे हे वेडावले तुमच्यासाठी
राया घेवून मला चला नितळ यमुनेकाठी...
काजळकाठी नटला सहवास मीही राया सुखावले
गारवा गुलाबी मस्त शराबी अलगद मी शहारले ।।२।।
बेहोश अदा ही माझी नटले मी अंगोअंगी
इंद्रधणू भरलेय मनी अहा राया रंगोरंगी
आसमंत रातीला दरवळला चंद्राची कोर
अंतरी भरलाय माझ्या बघा कस्तुरी गांधार..
राया प्रेमाची प्रीत गाणी सुर स्वरमाधूरी मी गायले
गारवा गुलाबी मस्त शराबी अलगद मी शहारले ।।३।।
