लाल परी
लाल परी
लाल परी लाल परी
सगळ्यात तू भारी
रात्रंदिवस सेवेत आमच्या
व्यथा तुझी न्यारी।
धावत राहते नेहमी
वाकड्या तिकड्या वळणावर।
माहेरवाशिणीला माहेरी सोडते आनंदाने
मुक्काम तुझा मात्र बसस्थानकावर।
थकत नाही तू कधी
दुःख ही तुझे सांगत नाही।
कमी पैशात पास काढून
कॉलेजात आमची ये जा होई।
बस कर्मचारी रात्रंदिवस असतात
लोकांच्या सेवेत उभे।
मुलाबाळांची पाटी त्यांची
सोसावे लागते सगळे।
सगळे प्रश्न लवकर सुटू दे
करू नको आमची अबाळ
मामाच्या गावाला जाण्यासाठी
रडतय तुझ्यासाठी छोट बाळ।
लाल परी एकच सांगते
आमचं सगळ्याच ऐकशील का?।
होउदे तुझ्या मनासारखं लवकर
आमच्यासाठी तू लवकर
रस्त्यावर धावशील का?
आठवत अजून बालपण ते
आईच्या बोटाला धरून तुझी पायरी चढण।
आणि पुढच्याच शिटावर बसायचं म्हणून मोठ्यानं रडणं।
