लाल परी
लाल परी
1 min
338
सद्या एस टी चा संप चालू
लाल परी रोडवर दिसत नाही
बंंद डोळयासमोरुन तुझी
छबी जात नाही
तुझ्या शिवाय जीव
जिवात राहत नाही
सहजीवनात अर्धांगिनीपेेक्षा
लाभला सहवास जास्त तुझा
बऱ्याच रात्री अन् दिवसा
काढले कुशित तुझ्या
तुझ्यासंंगे असताना तिन-चार
वेळा जिवावर बेतले
अशा कठीण प्रसंगी सुद्धा
तू मला अलगद कुशीत घेेतलंं
काळानुरुप बदलत गेेलेलं तुझं रुपडं
खाजगीकरणाने केेल तुझं कंबरडं वाकडं
कुत्सीतपणे काही लोक हिंनवू लागले
लालडबा .. ग्रामिण भागात ,
सर्वांच्या मनावर आहे तुुझा ताबा.
