लाल किल्ला
लाल किल्ला
भारताच्या लाल किल्ल्याची अलग शान,
मुघल शासकांची लालकिला आहे अनोखी पहचान.
स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्य दिवसाचे मुख्य ध्वजस्थान,
राष्ट्रीय-अंतरराष्ट्रिय संबोधनाचा पंतप्रधानाचा मान.
स्वातंत्र सैनिकांची स्वातंत्र लढाईचे स्मरणस्थान,
लाल किला भारतीयांचे राष्ट्रिय धरोहर किती छान.
लालकिलाची आगळी-वेगळी आन-बान-शान,
भारतीयांसाठी ते वंदनीय एकमात्र आस्थास्थान.
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोबत पंतप्रधानाचे नियमित संबोधन,
देशाच्या विकासाचा आराखडाचे देशवासियांना ओपचारिक भाषण.
पंतप्रधानसाठी लालकिला आहे अंतरराष्ट्रिय सम्मान मंच,
विदेशनीती, अर्थनीती राजनीतीचे लाल किल्ल्यावरुन अभिभाषण.
असे ऐतिहासिक स्थान झाले कलंकीत व महत्वहीन,
राष्ट्रविरोधी तत्वाने करुन लाल किलावर ध्वजारोहण.
केंद्र शासनाने जर घेतली असती वेळच दखल झटकन,
आणी रोखले असते किसान आंदोलन पटकन.
असामाजिक तत्व करु नसते शकले कधीही ध्वजारोहण,
कलंकीत लाल किल्ल्याचे सरकार वर लागले नसते लांछन.
सरकारने नेहमीच राखावा लाल किल्ल्याचा सम्मान,
अन्यथा देशाचा विश्र्वात होत राहिल असाच अपमान.
