STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

लाडकी लेक

लाडकी लेक

1 min
426

बोबडे बोल कुठे हरवले

लटके रागवणे कधी संपले

कलेकलेने सारे सरले

पेरले ते छान उगवले


लाडकी लेक माझी 

चढली बोहल्यावरी 

सौंदर्य खुलले तिचे 

जणू ती सोनपरी


लेक चालली सासरला 

जीव माझा गहिवरला

तिला पाहूनी आजवर तरला

आठवणीत तिच्या रमला


Rate this content
Log in