STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

कविता

कविता

1 min
683


किती सुखाचे अन किती दु:खाचे

दिवस भरभर निघूनी गेले

कालभ्रमण तू थांबणार नाही

मग वेचू कशाला क्षण दु:खातले ।।


संकल्पाची नित गुज मनी

ध्येयाचे हे मनकवडे मनी भरे

कोण आपला कोण दुसरा

मनी आणू कशाला दुजाभावरे ।।


नियम साधुनी धुणी रमवूनी

आत्मविश्वास हा पांघरूनी

काय कमविले काय हरविले

मग शोध कशाला घेऊ अंतरमनी ।।


प्रतिभेच्या या वेलीवरती

राग रंग निखळे उल्हासूनी

त्वरीत पोहोचण्या घाई नकोशी

मग चढू कशाला सरसरूनी ।।


साहित्य जगाला संवादाचा

धन्यवाद करावा शांतमनानी

ज्ञान घ्यावया ज्ञान द्यावया

मग एकाग्र कशाला राहूनी ।।


Rate this content
Log in