कविता
कविता
1 min
303
एकटाच जन्मा आला
एकटाच मरण्यासाठी
साद नच मिळेल तुजला
व्यर्थ तुझी ही हाकाटी
हेही माझे तेही माझे
जिवंतपणी उगाच करती
सांग माणसा मेल्यानंतर
सारे संगती काय नेती?
पैसाअडका सोनेनाणे
जमीनजुमला क्षणिक सारे
कधी पडती उलटे फासे
कधी वाहती सुखाचे वारे
जन्मा येता स्वत: रडशी
सगेसोयरे तेव्हा हसती
जातांना मग निवांत सारे
धायमोकळून गणगोत रडती
स्मशानापर्यंत जाण्यासाठी
चार खांद्यांची सोबत पुरेसी
पुढच्या वाटेवर असशील
तू एकटाच प्रवासी.....
