कविता म्हणजे
कविता म्हणजे
1 min
258
कविता म्हणजे मनातल सार काही
कागदावर उतरताना लेखणी देते ग्वाही
कविता म्हणजे दबलेल्या भावनांचा निचरा
कधी कधी असतो बुरसटलेल्या विचारांचा कचरा
कविता म्हणजे मनात कायम वळवळणारी गोम
समाजातल्या धगधगत्या प्रश्नांचा सतत जळणारा होम
कविता म्हणजे प्रेमवीरांची मंजूळ गाणी
कधी थरथरणारी तर कधी प्रेमाची अधूरी कहाणी
कविता म्हणजे तळपती तलवार
बसतो तिचा वर्मी अचूक वार
कविता म्हणजे आपुलकीच घरकूल
जिच्या कुशीत शिरून होता निरागस मूल
