STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

कविता - चित्र विचित्र

कविता - चित्र विचित्र

1 min
30.3K


तो आणि ती

किती सुंदर दोघांचं

भिंतीवरचं ते चित्र

आताचं सार विचित्र....


फ्रेम झाली जुनी

रंग झाले फिकट

नवे दिवस सरले

स्थिती झाली बिकट...


दिलखुश राजा तो

ती राणी गुलबदन

वाकबाण युद्धात

उजाड त्यांचे चमन....


मीच का ?तू का नाही ?

उत्तर कुणी देत नाही

संवाद हरले घरात

कुणीच बोलत नाही..


भिंतीवर नाही चित्र

हे सुद्धा किती विचित्र



साहित्याला गुण द्या
लॉग इन