STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

कविता असते जगण्याचाच भाग

कविता असते जगण्याचाच भाग

1 min
235

कविता देते आत्मभान जगण्याचे

कविता गाते गीत मांगल्याचे

कविता असते नदीसारखी प्रवाही

कविता होते वेदनेचा हुंकार


कविता शिकवते साज शृंगार

कविता काढते कधी लाज

कविता उठवते चारचौघातून

कविता उतरवितेही माज


कविता बसवते संतांच्या पंक्तीत

कविता करते वसूल मुद्दलासकट व्याज

कविता जन्मते समाधी अवस्थेतील उर्मीतून 

कविता हसते, रडते, काळजाला भिडते


कविता पाझरते पानाफुलातून , देठा- देठातून

कविता भिनते नसानसात , मना - मनात 

कविता अन्याय ,अत्याचाराविरुद्ध बुलंद आवाज

कविता उलथवून टाकते निरंकुश राजसत्ता 


कविता करते सोबत सावलीसारखी

कविता ठरते टिंगल टवाळीचा विषय

कविता असते कधी एरंडाचा गुऱ्हाळ

कविता छळते ,चिडवते ,प्रेयसीसारखी 


कविता शोधते पूर्ववैभवाच्या खुणा

कविता सांगते दैदिप्यमान इतिहास

कविता पेरते मनात दुर्दम्य आशावाद

कविता असते जगण्याचाच भाग



Rate this content
Log in