कवी कट्टा २०१८
कवी कट्टा २०१८
1 min
28.7K
संतोष
सुखवस्तूपणाने वाढलो
भरपूर वर्ष जगलो
संतोष या वृत्तीला
अजून तरी नाही भिडलो
असाच एक आला आवाज
“मला संतोष भेटला''
तडक तिकडे धावलो
तसाच त्याला गाठला
हरखून मग थोडा
खासच स्मित हसलो
वेंधळून मी त्याला
'दाव मग त्याला' बोललो
अवखळून तो म्हणाला
“काट्याकुट्यातच होता झोपलेला
काटा टोचून मला दुःखला
तेव्हांच मज तो भेटला”
मी पण गडबडा विनवून
हात त्याचा धरला
‘घेऊन चल मग’ बोललो
दुर्लभ त्या संतोष दर्शनाला
बघ बुआ तूच तुझं
दर्शन हवं तुला, हेच तो बोलला
"शोध घे तुझ्यातच तू तसा,
मगच मिळेल फळ कष्टाला"
