कवडसा
कवडसा
1 min
62
एक कवडसा हृदयाच्या कप्प्यातील आठवणींचा
जगण्यासाठी नवीन उमेद देणारा
एक कवडसा आशेचा
हरवलेल्या मनाला
उभारी देण्याचा
एक कवडसा
सुख दुःखावर मात करून
जीवन आनंदाने व्यतित करण्याचा
एक कवडसा
जिद्दी प्रयत्नांचा
अपयशाला नेटाने टक्कर देण्याचा
एक कवडसा
हव ते मिळविण्याचा
शिखरावर पोहचूनही
जमिनीवर राहण्याचा
एक कवडसा विज्ञानाचा
बुरसटलेल्या विचारांवर
मात करण्याचा
एक कवडसा
तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा
ज्ञानाची ज्योत पेटवण्याचा
एक कवडसा मदतीचा
तुमच्या माझ्या साथीचा
सर्वांगीण कल्याणाचा...
