कुटुंब दावेदार...
कुटुंब दावेदार...
कुटुंब असत आनंदाच खरं भागीदार
आपल्या जीवनातल्या स्वप्नाचा सूत्रधार
यात असत प्रेम थोडं अलगत अलवार
प्रत्येकजण जपत आपल्याला बनून कलाकार
इथं असत कोणी कठोर स्वभावी धारदार
तर असत कोणी प्रेमळ रसाळ अलंकार
कोणाचे इथे असतात सूत्रधारी सावकार
तर कोणाचे असतात प्रेमळ नाते थोडे हजार
मनाच्या अबोल बोली इथे असतात वारंवार
भांडणाचीही रेलचेल कधी होते शानदार
कधी भांडण संपवण्यासाठी कोणी होत सल्लगार
तर कधी समजून घेऊन कोणी बनत साक्षीदार
इथे मन जपणारे माणसं खरे असतात अवतार
तर कधी मन तोडणारेही सापडतात थोडे फार
कधी अबोल भावना न सांगताही समजतात अलवार
तर कधी कणखर यातणेत सहभागी होतात घरचे चार
कुटुंब असत थोडं विचित्र तर कधी थोडं प्रेमळ अनुस्वार
चिंतामुक्त होऊन जगतात इथेही माणसं मात्र हजार
इथे असत कोणी चितकोर तर कोणी असतात टिकाकार
तरीही कुटुंब असतं अनमोल आयुष्याचं खरंखुरं दावेदार.
