कुठं आहे स्वतंत्र 👈
कुठं आहे स्वतंत्र 👈
विकासाची पॅकेजवर पॅकेज येतात.
सरकारच्या तिजोर्या जनतेसाठी म्हणे भरभरुन वहातात.
तळागाळातला दारिद्र्याचा गाळ तरीही का वाढतोय.
घासभर अन्नासाठी देशाच भविष्य चिमुकल्या हातानी सिग्नल वर भीक का मागतय.
कुठं पहिला श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतच पलॅनिंग होत
दुसरीकडे आजही अवघडलया जननीला मैलोनमैल पायपीट करून सरकारी दवाखाणयात न्यावे लागते.
सर्वसामान्य पिचलेली जनता कोटयानुकोटी च्या आकड्यांत संपत्ती ठान मांडून बसलीय
पीडयानपीडया मुठभर लोकांच्या मोठमोठ्या महालात.
मुळ चालली करपुन फादयांना पोसन सुरू आहे.
मुलनिवासी गरीब होरपळून चाललाय त्यांच्या घामावर पोसलेला हुकुमशहा सावकार फुटेस्तोवय फुगत चाललाय
कष्ट करा मेहनत करा शिका संघटीत व्हा सारयाच फुकाच्या गोष्टी
फार फार तर चतुर्थ श्रेणीत लागेल तुमची वर्णी.
कमवलीच टेंलेटवर एखाद दुसऱ्याने खुर्ची.आडनावावरूनच होईल खेचाखेची.
म्हणे स्वतंत्र्यात श्वास घेतोय आपण.मग का होतोय शोसन कुठे आहे शासन.
गावकीत रस्ता बंद होतो सरपंचाला मारल जातय कामगार पिचतोय
जातींची राजकारण तर स्वैर पणे सुरू आहे
धर्माचच्या शस्राला धार लावण सुरू आहे.
कुठे स्वतंत्र आहे
