STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

कुठले रामराज्य अन कसले काय ?

कुठले रामराज्य अन कसले काय ?

1 min
484


कुणाला झापू 

कुणाला कापू 

विरोधक संपवू 

सर्वार्थाने .....


कशी जिरवली 

त्यांची मस्ती 

येडी जत्रा सारी 

खाली मुंडक वर पाय 



कुणाला दडवू 

कुणाला बडवू 

कुणाला रडवू

आमची मर्जी ...  


फोडाफोडी - झोडाझोडी 

सत्तेसाठी लाडीगोडी 

ओढा -ओढी करून कुरघोडी 

खुर्चीसाठी सर्व तयारी ...


उठा गड्यानो जागे व्हा 

उघड्या डोळ्याने सारे पहा 

काहीही झालं तरी बंडोबांना 

त्यांची जागा दाखवा ....


नीतिमत्तेला तिलांजली 

ठेवून सारी बुद्धी गहाण 

मारताहेत नेते बेंडूक उडी 

नावास उरला भारत महान 


बघा काय चाललंय ...

बापू तुमच्या देशात

कुठले रामराज्य 

अन कसले काय ? 






Rate this content
Log in