कुणीतरी
कुणीतरी
1 min
190
कुणीतरी मनाला मोहीनी घातलीय
मी अलगद अधीर पावलं टाकते
तरी डोळ्याची स्वतंत्र पंख....
गुलाम झालीय..
कुणीतरी दिलय गुपीत हसण्याचं
गवसते हळुहळू रहस्य अश्रुंचं
स्वप्नांच्या राज्यात ...
डोळ्यांच्या राजधानीत ....
कुणीतरी आलय साक्षीदार कवितेचं
उन्हसावल्या माझ्या श्वासाच्या
तळ्याकाठच्या ..गोड आठवणीच्या
कुणीतरी बोलतय
एकटच सतत....आरशात माझ्या
कुणाशी कळेना...
कुणीतरी माझ्या चिंतनी,
नेञ गुंतले कां लोचनी,
प्रीतीचा मोह आवरेना !!!!!
