STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

4  

Sushama Gangulwar

Others

कुणीतरी हवं असतं

कुणीतरी हवं असतं

1 min
174

कुणीतरी हवं असतं 

बाह्य सौंदर्यापेक्षा 

आत्मीय सौंदर्य जाणणार......


कुणीतरी हवं असतं 

तुम्ही धरला अबोला 

तर हळूच समजूत काढणार......


कुणीतरी हवं असतं 

मांडता येत नसतील भाव मनातले 

तर मुक्या शब्दांचं अर्थ जाणणार.....


कुणीतरी हवं असतं 

तुम्ही जरी रागावलत 

तरी हळूच हसत बोलणार.......


कुणीतरी हवं असतं 

सुख दुःखाच्या वाटेवर 

क्षणिक वेळ देणारं.......


कुणीतरी हवं असतं 

हृदयातील भाव ओळखून 

हळवं मन जपणार.......


कुणीतरी हवं असतं 

माझं तुझं म्हणण्यापेक्षा 

फक्त आपलं म्हणनार........


कुणीतरी हवं असतं 

जीवनाच्या प्रत्येक वळणावर 

शेवट पर्यंत साथ देणारं......


Rate this content
Log in