Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Others

4.0  

Rakesh More

Others

कुणीतरी असावं

कुणीतरी असावं

1 min
581


कुणीतरी असावं 

जिने माझ्या मनातलं ओळखावं 

कितीही लपवलं 

तरी स्पष्टपणे आरपार पहावं ||1||


कुणीतरी असावं 

जिने ओसंडून प्रेम करावं 

क्षणोक्षणी जिने 

माझ्यासाठी स्वतःला हरावं ||2||


कुणीतरी असावं 

जिला माझं मन कळावं 

माझ्यासाठी तिचं 

हृदय कधीतरी हळहळावं ||3||


कुणीतरी असावं 

जिने हृदयात बसावं 

भेटण्यासाठी मला 

तिने सतत आतुर असावं ||4||


कुणीतरी असावं 

हृदयाला एक विसावा

इतकीच अपेक्षा आहे 

तिला माझ्यातला मी दिसावा ||5||


कुणीतरी असावं 

जिने मनापासून माझं व्हावं 

माझ्या शांत राहण्याचं 

कारण नजरेतून ओळखावं ||6||


कुणीतरी असावं 

जिला माझं मन उमजावं 

माझ्या रागामागचं 

प्रेम मात्र अचूक समजावं ||7||


कुणीतरी असावं 

जिने स्वतःकडे ओढावं 

माझ्या हास्यामागचं 

दुःख अगदी अचूक शोधावं ||8||


कुणीतरी असावं 

जीला माझी चिंता असावी 

माझ्या हृदयातील 

तिला तिची प्रतिमा दिसावी ||9||


कुणीतरी असावं 

जिचा जीव माझ्यात फसावा 

जन्मोजन्मी तिचा जन्म 

फक्त माझ्यासाठीच असावा ||10||


Rate this content
Log in