STORYMIRROR

Eshawar Mate

Others

3.7  

Eshawar Mate

Others

कुणी देऊळ बांधल.

कुणी देऊळ बांधल.

1 min
41.5K


कुणी देऊळ बांधलं

कुणी राऊळ बांधलं।

नवसाची देव-घेव

धर्म दुकान मांडलं।।धृ।।

प्रसादाची मोठी थप्पी

एका दगडाच्या माथी।

जीता माणूस ऊपाशी

त्याची मात्र दुर्गती ।।

पुजेच्या मानासाठी

सारं गावच भांडलं।

मानसाने कनसापरी

मानसालाच कांडलं।।१।।

भोंदू कोठून आलारे

त्याला कुणी आणलारे।

दुष्काळात पाठीवर

ऐतखाऊ बांधलारे।।

अंगी त्याच्या बहू कळा

त्याने लोकांस नाडलं।

भेदभाव तो वाढवी

मत संताचं गाडलं ।।२।।

लोकं वेडे झाले भाऊ

त्यात शिकलेले खोंड।

बुद्धी गहान ठेऊन

रोज काळे करी तोंड।।

गांजा पिन्याऱ्यांची झुंड

त्याचं व्यसन वाढलं।

धोक्यात तरुनाई

शिवकवीने ताडलं।।३।।


Rate this content
Log in